Vulture Release : महाराष्ट्रात पुन्हा गिधाडांची मुक्तता होणार; मेळघाट, ताडोबा आणि सह्याद्रीत ३५ गिधाडांना मिळणार नवे अधिवास

Maharashtra Vulture Conservation Project to Release 35 More Vultures : महाराष्ट्रातील गिधाड संवर्धन मोहिमेला नवे बळ मिळणार आहे. हरियानातील पिंजोर केंद्रात जन्मलेली ३५ गिधाडे राज्यात आणली जाणार आहेत. मेळघाट, ताडोबा आणि सह्याद्री परिसरात त्यांची मुक्तता करण्याचे नियोजन आहे.
Maharashtra Vulture Conservation

Maharashtra Vulture Conservation

sakal
Updated on: 

नागपूर : महाराष्ट्रातील गिधाड संवर्धन मोहिमेला आणखी बळ मिळणार आहे. हरियानातील पिंजोर येथील जटायू संवर्धन प्रजनन केंद्रात जन्मलेल्या ३५ गिधाडांना लवकरच महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे. यापूर्वी राज्यात ३४ गिधाडे आणण्यात आली होती. नव्याने आणण्यात येणाऱ्या गिधाडांमध्ये लांब चोचीची आणि पांढऱ्या पाठीची अशा दोन प्रजातींचा समावेश आहे. वन विभागाच्या सहकार्याने बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी (बीएनएचएस) राज्यात गिधाड संवर्धन प्रकल्प राबवत आहे.

Loading content, please wait...