
देऊळगाव राजा : तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील महाराष्ट्र शासनाचा युवा शेतकरी पुरस्कारप्राप्त प्रयोगशील शेतकरी कैलास अर्जुनराव नागरे याने होळीच्या दिवशी (ता. १४ मार्च) विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. या घटनेने बुलडाणा जिल्हा हादरला. मात्र, ही आत्महत्या परिसरातील शेतकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठीच्या आंदोलनातील बलिदान आहे.