Mahatma Phule Scheme : पावणेदोन वर्षाच्या बाळाने दिला आवाजाला ‘ओ’ ; एम्समध्ये महात्मा फुले योजनेतून पहिलेच कॉक्लिअर इम्प्लांट
AIIMS : २१ महिन्यांच्या बाळाला कर्णबधिरतेचं निदान झालं आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून एम्समध्ये कॉक्लिअर इम्प्लांट केले. ‘ओ’ आवाज काढल्याने आई-वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं, हे यश एक चमत्कार ठरलं.
नागपूर : दिवस लोटत गेले, बाळ २१ महिन्यांचे झाले. पण, आवाज देऊनही लक्ष देत नव्हते. त्यामुळे कुटुंब चिंतेत पडले. वैद्यकीय तपासणीतून बाळ कर्णबधिर असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी कॉकलिअर इम्प्लांट करून घेण्याचा सल्ला दिला.