esakal | जि. प. पोटनिवडणूक : महाविकास आघाडीत फूट, शिवसेना स्वबळावर
sakal

बोलून बातमी शोधा

Mahavikas Aghadi

जि. प. पोटनिवडणूक : महाविकास आघाडीत फूट, शिवसेना स्वबळावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना (nagpur ZP election) दिलेली स्थगिती आयोगाने उठविली आहे. राज्यात आणि जिल्हा परिषदेत कॉंग्रेस, राकॉं व शिवसेनेची महाविकास आघाडी सत्तेत असली तर या पोट निवडणुकीत महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi government) फूट पडली आहे. कॉंग्रेस आणि राकॉं यांची आघाडी झाली असून शिवसेना (shivsena) स्वतंत्र लढणार आहे.

हेही वाचा: OBC आरक्षणाशिवायच होणार ZP निवडणुका, तारीख जाहीर

काँग्रेस १६ पैकी १० जागांवर लढणार असून, राष्ट्रवादीला ५ व शेतकरी कामगार पक्षासाठी १ जागा सोडली आहे. शिवसेना स्वबळावर १२ जागी उमेदवार मैदानात आहे. आघाडीसंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या झालेल्या बैठकीत आपापल्या जागा ते लढविणार होते. परंतु, भाजपच्या ज्या चार जागा रिक्त झाल्या होत्या. त्यावर एकमत होत नव्हते. पण वेळेवर तिढा सुटला यातील राजोला, गुमथाळा, निलडोह या तीन जागी काँग्रेसने उमेदवारी दिली, तर इसासनी सर्कलमध्ये राष्ट्रवादीने उमेदवार दिला. काँग्रेसने उमेदवारी देताना फारसा बदल केला नाही. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असलेले मनोहर कुंभारे यांचा सर्कल महिलासाठी आरक्षित झाल्याने त्यांच्या पत्नी सुमित्रा कुंभारे यांनी उमेदवारी देण्यात आली. तर गोधनी रेल्वेच्या विद्यमान सदस्य ज्योती राऊत यांना वगळून काँग्रेस कमिटीच्या सचिव कुंदा राऊत यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीनेही उमेदवार कायमच ठेवले. गटनेते चंद्रशेखर कोल्हे यांचा पारडसिंगा सर्कल महिलासाठी आरक्षित झाल्याने त्यांच्या पत्नी शारदा कोल्हे यांना रिंगणात उतरविले, तर भिष्णूरच्या विद्यमान सदस्य पूनम जोध यांच्या जागी त्यांचे पती प्रवीण जोध यांना रिंगणात उतरविले.

१११५ केंद्रावर मतदान, ६ लाखांवर मतदार -

जिल्हा परिषदेच्या १६ व पंचायत समितीच्या ३१ जागेसाठी ५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. त्यासाठी १११५ मतदान केंद्र तयार करण्यात आले असून, ६,१६,०१६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीसाठी १३ निवडणूक निर्णय अधिकारी व १३ सहा. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. निवडणूक पार पाडण्यासाठी ४,९०८ मनुष्यबळ लागणार आहे.

सभेसाठी ५० लोकांना परवानगी

निवडणूक आयोगाने कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने प्रचाराच्या मर्यादा घालून दिल्या आहेत. उमेदवाराला सभा व बैठकांसाठी ५० लोकांची परवानगी आहे. त्यासाठी प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे.

loading image
go to top