
केळवद : निसर्गतःच अथवा आजार आणि अपघाताने दिव्यांग झालेले नागरिक हे आपल्या समाजाचे घटक आहेत. त्यांच्याप्रती आदर ठेवणे समाजाचे कर्तव्य आहे. अशा व्यक्तींसाठी केळवदचा युवक महेश बोंदरे गेल्या सहा वर्षांपासून कार्य करीत आहे. दिव्यांगांच्या हक्काचा लढा लढण्याबरोबरच त्यांचे जीवन सुकर होईल यासाठी आतापर्यंत तीनशेपेक्षा जास्त दिव्यांग नागरिकांना विविध वस्तूंचे वितरण केले आहे.