नागपूर : सध्या मोठ्या प्रमाणावर गोवंश तस्करी होत असल्याने तस्करांना जेरबंद करा असे आदेश पालकमंत्री व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिसांना दिले. पोलिसांनी तातडीने जुनी कामठी भागात २३८ गोवंशीय प्राण्यांची सुटका केली..विशेष म्हणजे, सुमारे २४ लाखांच्या मुद्देमालासह तस्करांनी टोळी जेरबंद करण्यात आली. जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा या कारवाईनंतर सतर्क झाली असून, गोवंश तस्करांच्या मुसक्या आवळणे सुरू केले आहे..गोवंश हत्या होऊ नये यासाठी बावनकुळे यांनी पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यामुळे पोलिस अलर्ट मोडवर होते. गुरुवारी रात्री माहितीच्या आधारे पोलिसांनी जुनी कामठी परिसरातील एका गोदामात छापा टाकला. .Global Poha Day : कांदे-पोह्यांमुळे जुळतात नाती चटकन भूक भागवते; सात जूनला जागतिक पोहे दिवस, मराठी संस्कृतीत विशेष महत्त्व.यावेळी २३८ गोवंश त्याठिकाणी मरणासन्न अवस्थेत आढळले. पोलिसांनी त्यांची सुटका केली. त्यांची एकूण किंमत सुमारे २३,८०,००० रुपये आहे. या प्रकरणी पोलिसांनी गोदाम मालक आणि घरमालक नब्बू वजीर कुरेशी, साजिद कुतुब कुरेशी, जुबेर अल्ताब कुरेशी, फैय्याज सत्तार कुरेशी, आसिफ कुरेशी आणि त्यांना मदत करणाऱ्या इतर व्यक्तींवर गोवंशीय प्राण्यांची अवैध कत्तल करण्याचा आरोपात गुन्हा नोंदवून ताब्यात घेतले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.