

BJP Suffers Big Jolt in Hingna Belt After Leader Switches Sides
Sakal
हिंगणा: डिगडोह येथील भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला असून हिंगणा पंचायत समितीचे माजी उपसभापती सुरेश काळबांडे यांनी आपल्या अनेक समर्थकांसह भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात जाहीर प्रवेश केला. हिंगणा मतदारसंघात या घडामोडीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.