Malkapur Theft: भरदिवसा कारची काच फोडून चार लाखांचे दागिने लंपास ,मलकापुरातील भातृमंडळ रोडवरील घटना : चोरटे सीसीटीव्हीत कैद

Gold Jewellery Theft: मलकापुरातील गजबजलेल्या भातृमंडळ रोडवर भरदिवसा कारची काच फोडून २७ ग्रॅम सोन्याचे चार लाखांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले; सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू.
A car window was broken and a bag containing gold jewellery worth ₹4 lakh was stolen on Bhatru Mandal Road in Malkapur.

A car window was broken and a bag containing gold jewellery worth ₹4 lakh was stolen on Bhatru Mandal Road in Malkapur.

ESakal

Updated on: 

मलकापूर, : शहरातील गजबजलेल्या भातृमंडळ रोडवर भरदिवसा कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल चार लाख रुपये किमतीचे २७ ग्रॅम सोन्याचे दागिने असलेली बॅग लंपास केली. दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

चोरट्यांची ही कृती परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

Loading content, please wait...