
नागपूर : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी त्याने धमकीचा फोन केल्यानंतर काही तासातच अटक केली. उमेश विष्णू राऊत (वय ४०, रा. तुळशीबाग रोड, महाल, हल्ली रा. विमा दवाखान्याजवळ, सक्करदरा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. गडकरींचे निवासस्थान उडवून देण्याची धमकी आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या दोन्ही निवासस्थानी बाँम्बची शोधाशोध केली. यानंतर फोन कुठून आला याचा मागोवा घेत अवघ्या काही तासात आरोपीला अटक केली.