esakal | 'मेडिकल'च्या किचनमधील कर्मचाऱ्याचाच कोरोनानं मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

corona

'मेडिकल'च्या किचनमधील कर्मचाऱ्याचाच कोरोनानं मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मेडिकलमध्ये २० मार्च रोजी दिवशी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. यातील एक कर्मचारी मेडिकलच्या किचनमध्ये कार्यरत होता. गुरुवारी (ता.१५) आणखी एका किचनमधील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. महिनाभरातील ही तिसरी घटना आहे. दिगांबर ठवकर, असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.

हेही वाचा - भीषण वास्तव! सभोवताली मृतदेहांची गर्दी अन् हाताळणारे फक्त चारच जण

कर्तव्यावर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांचे कोविडमुळे तीन पेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. यापूर्वी झालेल्या बंडू बारेकर या कर्मचाऱ्याने मेडिकलच्या लसीकरण केंद्रात लस घेतली होती. यानंतर ताप आला आणि लगेच शनिवारी या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. लसीकरणामुळे या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असल्याची शंका व्यक्त करण्यात येत होती. २० मार्च रोजी कोरोनाच्या बाधेने महादेव रामटेके हा कर्मचारी देखील दगावला होता. तर गुरुवार १५एप्रिल रोजी दिगांबर ठवकर हा कर्मचारी दगावला आहे. मेडिकलमध्ये आतापर्यंत मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये बंडू बारेकर, महादेव रामटेके यांच्यासह सिंधूबाई यांचा समावेश आहे.

loading image