Nagpur News : सक्करदरा येथील गौतम फुलझेले याने उधारीच्या पैशावरून झालेल्या वादात सासऱ्याच्या डोक्यावर वरवंटा घालून त्यांची हत्या केली. मेडिकलमध्ये उपचारादरम्यान जनार्दन दमके यांचा मृत्यू झाला, आरोपीला अटक करण्यात आली.
नागपूर : मुलीकडून तिच्या वडिलांनी घेतलेल्या उधारीचे पैसे परत करण्याच्या वादातून जावयाने झोपेत सासऱ्याच्या डोक्यावर वरवंटा मारून त्यांची हत्या केली. सक्करदरा पोलिसांनी आरोपीला अटक केली.