
नागपूर : डोक्यावर सिलिंडर आदळून मित्रानेच मित्राचा खून केला. ही घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विहिरगाव येथे शुक्रवारी उघडकीस आली. आरोपी चार दिवसांपूर्वी खून करून पळून गेला. मृतदेह घरात पडून होता. दुर्गंधी आल्याने ही घटना समोर आली. अनिल पवार (३६) रा. पिपळगाव, यवतमाळ, ह.मु. विहिरगाव असे मृताचे नाव आहे.