

Woman Strangled In Field After Being Called Out At Night
Esakal
पोंभूर्णा तालुक्यातील चेक खापरी येथे चुलत दिरानेच आपल्या वहिनीची गळा दाबून हत्या केली. ही घटना प्रेमसंबंधाच्या संशयातून घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रविवारी रात्री धनराज सोनटक्के यानं संजना सोनटक्के हिला रात्री साडे अकरा वाजता निर्जन ठिकाणी बोलावून गळा दाबून हत्या केली. त्यानंतर ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.