रॉंग नंबरने केला घोळ; बहिणींचे अश्लील छायाचित्र व्हायरल; नागपुरातील घटना

रॉंग नंबरने केला घोळ; बहिणींचे अश्लील छायाचित्र व्हायरल; नागपुरातील घटना
Updated on

नागपूर : कोराडीत राहणाऱ्या १९ वर्षीय युवतीने मैत्रिणीला कॉल करताना तिचा रॉंग नंबर नाशिकच्या एका युवकाला लागला. रॉंग नंबरमुळे दोघांची मैत्री झाली. ही ‘फोन अ फ्रेंडशिप’ (Fake Friendship )त्या युवतीला चांगलीच भोवली. त्या युवकाने विश्वासाला तडा देत तिचे व तिच्या लहान बहिणीचे अश्लील फोटो मॉर्फ केले. तसेच दोघींचेही छायाचित्र बनावट फेसबुक (Facebook account) आणि इंस्टाग्रामवर (Instagram) त्याने अपलोड केले. हा प्रकार उघडकीस येताच युवतींच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कल्पेश ठाकरे (नाशिक) असे आरोपी युवकाचे नाव आहे. (man viral pics of sisters on social media in Nagpur)

रॉंग नंबरने केला घोळ; बहिणींचे अश्लील छायाचित्र व्हायरल; नागपुरातील घटना
कुलरमुळे कोरोना संसर्ग होऊ शकतो का? जाणून घ्या काय आहे डॉक्टरांचं मत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १९ वर्षीय तरुणी रिया (बदललेले नाव) ही कोराडी लहान बहीण, आई-वडिलांसह राहते. आई गृहिणी आहे तर वडील मजूर आहेत. रिया ही बी. कॉम प्रथम वर्षाला आहे. तर तिची बहीण बारावीत आहे. घटना २०१९ची आहे. रियाला मैत्रिणीला फोन करायचा होता. नजरचुकीने कल्पेश ठाकरे याला रॉंग नंबर लागला. दोघांनी एकमेकांची ओळख दिल्यानंतर त्यांचे फोनवर वारंवार बोलणे होत होते. त्यातून त्यांची मैत्री झाली.

दोघेही एकमेकांचे फेसबुक आणि इंस्टाग्रामवर मित्र झाले. यातून त्यांचे संबंध वाढत गेले. ते एकमेकांच्या प्रेमात पडले. फेसबुक मॅसेंजरवरून एकमेकांना कॉल सुरू झाले. तर इंस्टावर प्रायव्हेट चॅटिंग सुरू झाली. दोघांनी एकमेकांना आपापल्या कुटुंबाबाबत माहितीची देवाणघेवाण केली. तसेच आपापल्या कुटुंबीयांचे छायाचित्र, व्हिडिओ शेअर केले. कल्पेश ठाकरे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा मुलगा असल्याने तो तिला वारंवार व्हिडिओ कॉल करण्यासाठी धमकावत होता. त्यामुळे रिया त्याच्या धमक्यांमुळे त्रस्त झाली होती.

अश्लील छायाचित्र व्हायरल

आरोपी कल्पेश हा वारंवार फोन करून किंवा व्हिडिओ कॉल करण्याची मागणी करीत होता. तसेच तिच्या बहिणीशीही बोलत होता. त्यामुळे रियाने त्याचे फोन उचलणे बंद केले. चिडलेल्या कल्पेशने दोघीही बहिणीचे फोटो मॉर्फ अश्लील छायाचित्र तयार केले. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बनावट आयडी तयार करून ते त्यावर टाकले.

रॉंग नंबरने केला घोळ; बहिणींचे अश्लील छायाचित्र व्हायरल; नागपुरातील घटना
नागपूरकरांनो, कोरोनाचा प्रकोप ओसरतोय; मृत्यूचा आकडाही कमी

सोशल मीडियावरील मैत्री घातक

फेसबुक, ट्‍वीटर आणि इंस्टाग्रामसह अन्य सोशल मीडियावरील मैत्री घातकच आहे. फेसबुकवरील मैत्रीमुळे अनेकांना आतापर्यंत पश्चात्ताप झाला आहे. विशेषतः तरुणी आणि महिलांना सोशल मीडियावरील मैत्री अंगलट आल्याच्या काही घटना या महिन्यात समोर आल्या आहेत. फेसबुकवरील मित्राने बलात्कार केल्याच्याही घटना घडल्या आहेत.

(man viral pics of sisters on social media in Nagpur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com