

New high-fat and low-fat milk rates announced for dairy farmers in Mandal area.
esakal
साळवा: दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून मांडळ एरियात २१ नोव्हेंबर २०२६ पासून हाय फॅट आणि लो फॅट दुधाचे नवीन दरपत्रक लागू करण्यात आले आहे. ‘रेट कोड करंजा’नुसार हे दर निश्चित करण्यात आले असून दुधातील फॅट, एसएनएफ आणि सीएलआरच्या प्रमाणानुसार शेतकऱ्यांना दूधदर मिळणार आहेत. वाढत्या चारा आणि पशुखाद्याच्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर या नव्या दरांमुळे पशुपालकांना आर्थिक आधार मिळण्याची अपेक्षा आहे.