
अमरावती : एकीकडे मराठी भाषा गौरवदिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येत असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शिक्षकांची काही खैर नाही, अशी धक्कादायक स्थिती आहे. धोरणांचा अभाव, अशैक्षणिक कामांचा बोझा, सातत्याने निघणारे नवनवे जीआर अन् जुन्या प्रश्नांवरच तोडगा निघत नसताना नव्याने निर्माण होणारे प्रश्न, अशा असंख्य समस्यांच्या दलदलीत शिक्षणाची ही गंगा खोलवर रुतत असल्याने त्याला अखेरच्या उचक्या लागल्या आहेत. विशेष म्हणजे, शिक्षकांच्या प्रश्नांची मालिका आता शतकाच्या उंबरठ्यावर आहे.