नववर्षात लग्न करताय? 'हे' आहेत ६४ मुहूर्त; चातुर्मासामुळे जुलैपर्यंतच घ्या आटोपून!

marriage date in marathi new years
marriage date in marathi new years

नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे थाटामाटात लग्नसमारंभ करण्याचे दिवस मागे पडले असून साध्या पद्धतीने समांरभ होत आहेत. कोरोनामुळे वेळेवर तारखांत बदल करावा लागत असल्याने अनेक जण अडचणीमध्ये सापडतात. अशातच गुरू आणि शुक्र अस्त आल्याने 'यंदा कर्तव्य आहे' अशा वधू-वरांसाठी या मराठी वर्षामध्ये फक्त ६४ शुभ मुहूर्ताच्या तारखा आहेत. 

मराठी नववर्षांमध्ये २४ एप्रिलपासून सनईचे सूर वाजण्यास सुरुवात होणार आहे. यावर्षी लग्नाच्या बोहल्यावर जाणाऱ्या वधू-वरांसाठी ६४ तारखा शुभ मुहूर्त म्हणून आहेत. यापैकी, सर्वाधिक १३ लग्नतिथी मे महिन्यात आहेत. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यामध्ये चातुर्मास असल्याने शुभ मुहूर्त नाहीत. तर, गुरू अस्त, शुक्र अस्त असल्याने फेब्रुवारी २०२२ आणि मार्च २०२२ मध्ये शुभ मुहूर्त नाहीत. कोरोनामुळे वधू-वर पित्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे, आपत्कालीन लग्न करण्याची वेळ आल्यास काही मुहूर्त देण्यात आले आहेत. 

कोरोना नियमांचे पालन करीत निर्विघ्न पार पाडा लग्न! - 
लग्न म्हटले की काही ना काही विघ्न ठरलेलेच! आता तर कोरोनाच्या रुपाने सर्वात मोठे विघ्न आलेले आहे. हे संकट मोठे असले तरी त्यावरही मार्ग आहेच. विवाह सोहळ्यासाठी ठरवून दिलेले नियम आणि निर्बंधांचे पालन करणे आवश्यक आहे. विवाहासारख्या मंगल प्रसंगाला गालबोट लागू नये म्हणून मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत योग्य काळजी घेत नवरीला घरी घेऊन या! 

विवाह शुभ मुहूर्त : 

  • एप्रिल - २४, २५, २६, २८, २९, ३० (६ मुहूर्त) 
  • मे - १, २, ३, ४, ५, ८, १३, २०, २१, २२, २८, ३०, ३१ (१३ मुहूर्त) 
  • जून - ४, ६, १६, १९, २०, २६, २८ (७ मुहूर्त) 
  • जुलै - १, २, ३, १३, १५ (५ मुहूर्त) 
  • नोव्हेंबर - २०, २१, २९, ३० (४ मुहूर्त) 
  • डिसेंबर - ७, ८, ९, १३, १९, २४, २६, २७, २८, २९, ३१ (११ मुहूर्त) 
  • जानेवारी - २०, २२, २३, २, २६, २७, २९ (७ मुहूर्त) 
  • फेब्रुवारी - ५, ६, ७, १०, १६, १७ (६ मुहूर्त) 
  • मार्च - २३, २५, २६, २८, २९ (५ मुहूर्त) 

गुरू, शुक्र अस्तातील विवाह मुहूर्त : 

  • फेब्रुवारी - २०, २१, २२, २३, २४, २५ (६ मुहूर्त) 
  • मार्च - ४, ५, ९, १०, २० (५ मुहूर्त) 

चातुर्मासातील विवाह योग्य दिवस : 

  • ऑगस्ट - १०, ११, १४, १८, २०, २१, २६, २७ (८ मुहूर्त) 
  • सप्टेंबर - १६ (फक्त १ मुहूर्त) 
  • ऑक्टोबर - ८, १०, ११, १२, १८, १९, २०, २१, २४ (९ मुहूर्त) 

गुरू, शुक्राचा अस्त आणि चातुर्मासात लग्नाच्या तारखा काढण्यात येत नाही. मात्र, जीवनशैलीतील होणारे बदल व कोरोनाची परिस्थिती पाहता अत्यावश्यक परिस्थितीसाठी मुहूर्त काढले आहेत. या मुहूर्तांमध्ये ज्या ग्रहाचा अस्त असेल त्याचे पूजन करून लग्न सोहळा पार पाडावा. 
-डॉ. अनिल वैद्य, ज्योतिषाचार्य 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com