Chaturmas, Guru Shukra Asta: बँड, बाजा, बारात आता २०२७ मध्येच; चातुर्मास, गुरू- शुक्राचा अस्त व सिंहस्थामुळे लांबले विवाहाचे मुहूर्त

Chaturmas, Guru Asta and Shukra Asta Explained: चातुर्मास, गुरु व शुक्राचा अस्त आणि सिंहस्थ काळामुळे २५ जुलै २०२६ ते २४ जानेवारी २०२७ या कालावधीत विवाहाचे शुद्ध मुहूर्त नसल्याचे ज्योतिषतज्ज्ञांचे मत आहे.
Chaturmas, Guru Shukra Asta

Chaturmas, Guru Shukra Asta

esakal

Updated on

नागपूर: येत्या २५ जुलै ते २१ नोव्हेंबरपर्यंत चातुर्मास असून, गुरुचा अस्त २७ जुलै ते १० ऑगस्ट आणि शुक्राचा अस्त १९ ते २८ ऑक्टोबरदरम्यान आहे. याशिवाय ३१ ऑक्टोबर ते २४ जानेवारी २०२७ पर्यंत गुरू सिंह राशीत असल्याने व सिंहस्थ काळाचा दोष असल्यामुळे या कालावधीत विवाहाचे शुद्ध मुहूर्त राहणार नसल्याची माहिती, आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल नागेश वैद्य यांनी दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com