
अकोला : पद्मश्री मारुती चितमपल्लींच्या अजूनही अप्रकाशित असलेल्या ‘प्राणी आणि वृक्षकोश’ संदर्भातील साहित्य प्रकाशनाची वाट बघत आहे. हे साहित्य प्रकाशित करण्याची जबाबदारी मराठा सेवा मंडळ व दख्खनी मराठा मंडळ घेणार आहे. या बाबतीत मंडळाचे कार्यकर्ते लवकरच त्यांच्या सोलापूर येथील नातेवाइकांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करणार आहेत, असे मंडळाचे अध्यक्ष दिनू सुरसे यांनी मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत जाहीर केले.