
नागपूर : बोगस शालार्थ आयडी प्रकरणात पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी रोहिणी विठोबा कुंभार (वय ४९) आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर श्रीराम काळुसे (वय ५०) यांना बुधवारी (ता.३०) अटक केली. दोघांनीही शालार्थ आयडी देणे बंद असताना ३९८ नविन शिक्षकांचे वेतन काढून शंभर कोटींचा भ्रष्टाचार केल्याची माहिती समोर आली आहे.