

Nagpur News
esakal
नागपूर: अजनगाव सूर्जी येथील देवनाथ मठाचे पीठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराजांनी स्थापन केलेल्या विश्व मांगल्य सभेच्या माध्यमातून ‘मातृ शक्ती’ जागरणाचे कार्य गेल्या १६ वर्षांपासून अविरत सुरू आहे.
प्रत्येक स्त्रीमधील मातृत्वाची शक्ती ओळखून संस्कारक्षम पिढी घडवण्याचे कार्य करणे, संस्थेचा उद्देश आहे. ही सभा महिलांच्या सदाचार सभा, बालसंस्कार वर्ग आणि विविध संस्कृती आधारत कार्यक्रमांच्या माध्यमातून कार्य करते.