esakal | नागपूर : मातृवंदना योजना ठरतेय महिलांसाठी वरदान
sakal

बोलून बातमी शोधा

matruvandna.jpg

नागपूर : मातृवंदना योजना ठरतेय महिलांसाठी वरदान

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नागपूर : माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे. तसेच मातामृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रित राहावा यासाठी १ जानेवारी २०१७ पासून राज्यात प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही प्रथमत: गर्भवती असलेल्या महिलांसाठी राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यात आजवर १ लाख ८ हजार ३०३ गर्भवती मातांची नोंदणी झाली आहे. त्यांना ४६ कोटींवरील अनुदानही वितरित करण्यात आले आहे. एकंदरीत ही योजना गर्भवती मातांसाठी वरदानच ठरत असल्याचे दिसून येत आहे.

ग्रामीण व आदिवासी भागात अनेक गर्भवतींना प्रसूतीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत काम करावे लागते. त्याचे परिणाम बाळावर व मातेवर होत असल्याने केंद्र सरकारने दारिद्र्य रेषेखालील तसेच दारिद्र्य रेषेवरील मातांसाठी १ जानेवारी २०१७ पासून ही योजना राबविली आहे. योजनेत गर्भवतीस तीन टप्प्यांत ५ हजार रुपये देण्यात येते. आरोग्य विभागाच्या माध्यमातून अशा महिलांचा शोध घेऊन त्यांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेत दरवर्षी उद्दिष्ट दिले जाते. जिल्ह्यात १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत प्रधानमंत्री मातृवंदना सप्ताह कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

नागपूरच्या आरोग्य विभागाने उद्दिष्टापेक्षाही कितीतरी जास्त गर्भवतींची नोंदणी करून लाभ मिळवून दिला आहे. आजवर जिल्ह्यात या योजनेसाठी १.०८ लाख ३०३ महिलांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील अनुदानाचा लाभ १ लाख ३२५ महिलांना, दुसऱ्या टप्प्यातील अनुदान १ लाख ६२० गर्भवती मातांना तर शेवटचे व तिसऱ्या टप्प्यातील अनुदान ते ७९ हजार ९६३ महिलांना त्यांच्या बॅंक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) व्दारे वळते केले आहे.
- रज्जू परिपगार, जिल्हा कार्यक्रम समन्वयक

तालुकानिहाय तिन्ही टप्प्याचा लाभ प्राप्त महिला

तालुका गर्भवती मातांची संख्या

 • नागपूर (ग्रा.) ४८८५

 • हिंगणा ५२७३

 • भिवापूर १४0३

 • काटोल २0५७

 • कुही २२८१

 • कळमेश्‍वर २३६२

 • कामठी ३000

 • मौदा ३३२८

 • रामटेक २७0२

 • सावनेर ३६0६

 • उमरेड २५४१

 • नरखेड १९९५

 • पारशिवनी २५८२

loading image
go to top