BSP Mayawati : काँग्रेसने बाबासाहेबांना भारतरत्न का दिले नाही? मायावती यांचा सवाल

बसपाच्या पूर्व विदर्भातील उमेदवारांच्या प्राचारासाठी मायावती यांची बेझनबाग मैदानावर जाहीर सभा घेण्यात आली.
mayawati over dr babasaheb ambedkar bharat ratna award by congress
mayawati over dr babasaheb ambedkar bharat ratna award by congress Sakal

Nagpur News : आज संविधानाच्या नावावर मते मागणाऱ्या काँग्रेसने संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हयात असताना भारतरत्न पुरस्कार दिला नाही तर आता भाजप दलितांचे आरक्षण संपुष्टात आणत असल्याचे सांगून बसपाच्या नेत्या मायावती यांनी काँग्रेस आणि भाजप यांच्या कथनी आणि करनीमध्ये फरक असल्याचा आरोप केला.

बसपाच्या पूर्व विदर्भातील उमेदवारांच्या प्राचारासाठी मायावती यांची बेझनबाग मैदानावर जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याचा दोन बाजू असल्याचे सांगून बसपाच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

म्हणून बसपाची स्थापना

देशाच्या स्वातंत्र्यापासून सर्वाधिक काळ केंद्रात काँग्रेस सत्तेवर होती. मात्र, त्यांना बाबसाहेबांना भारतरत्न पुरस्कार द्यावा असे वाटले नाही. बसपाचे संस्थापक कांशीराम यांच्या मृत्यूनंतर दुखवटा जाहीर करण्याचे सौजन्य काँग्रेसने दाखवले नाही.

काँग्रेसने सत्तेवर असताना मंडल आयोग लागू केला असता आणि दलित, शोषित व गरिबांना त्यांचा हक्क व लाभ लाभ दिला असता बहुजन समाज पार्टीची स्थापना करण्याची गरजच भासली नसती असेही मायावती यावेळी म्हणाल्या.

सर्वांचे जाहीरनामे फसवे

राजकीय पक्षांचे जाहीरनामे फसवे असतात. जनतेला प्रलोभने देण्यासाठीच त्याचा वापर केला जातो. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे बसपाने कधीच निवडणुकीत जाहीरनामा प्रसिद्ध करीत नाही. थेट कार्य करते असेही मायावती यांनी सांगितले.

भाजपच्या गॅरंटीला भुलू नका

भाजपचे धोरण जातीवादी आणि भांडवलवादी आहे. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजप कोणासाठी काम करीत आहे उघडकीस आले आहे. निवडणुकीत फक्त आमिषे दाखवण्याचे काम भाजप करीत आहे. खासगीकरणाच्या माध्यमातून आरक्षण संपुष्टात आणले जात आहे. भाजपने दिलेल्या गॅरंटीला आता भुलू नका, असे आवाहनही मायावती यांनी केले.

बसपामुळेच भारतरत्न

व्ही.पी सिंग यांनी पंतप्रधान असताना बसपाला पाठिंबा मागितला होता. त्या बदल्यात केंद्रात काही मंत्रिपदे देऊ केली होती. मात्र, कांशीराम यांनी बाबसाहेब आंबेडकर यांना भारतरत्न द्यावे आणि मंडल आयोग लागू करावा या अटीवर समर्थन जाहीर केले होते. याकडे लक्ष वेधून बाबासाहेबांना भारतरत्न बसपामुळेच मिळाल्याचा दावा मायावती यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com