MBA MMS CET Exam : एमबीए-एमएमएस सीईटीचा पेपर आता २०० ऐवजी १५० गुणांचा! ५० प्रश्नांची संख्या घटली

एमबीए आणि एमएमएस सीईटीमध्ये पाच पर्याय असलेले २०० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जात होते. प्रत्येक प्रश्नाला एक गुण होता. आता सुधारित पद्धतीनुसार १५० प्रश्नांसाठी १५० गुण असतील.
 MBA MMS CET Exam

MBA MMS CET Exam

Sakal
Updated on: 

नागपूर - व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या एमबीए, एमएमएस, पीजीडीएम व पीजीसीएम या चार अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेच्या स्वरूपात महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने महत्त्वपूर्ण बदल केला आहे. २०२७-२८ या शैक्षणिक सत्रापासून परीक्षेतील प्रश्नांची संख्या २०० वरून १५०, तर एकूण गुण २०० वरून १५० करण्यात आले आहेत. त्याचबरोबर परीक्षेचा कालावधीही १५० मिनिटांवरून १२० मिनिटे करण्यात आला आहे.

Loading content, please wait...