MD Drug Trafficking: ग्रामीण भागालाही एमडीचा विळखा; लाखोंचा मुद्देमाल जप्त

MD Drugs Found in Rural Maharashtra: ग्रामीण भागात एमडी ड्रग्जचा शिरकाव; पोलिसांनी लाखोंचा मुद्देमाल केला जप्त.
MD Drug Trafficking
MD Drug Traffickingsakal
Updated on

Lakhs Worth of MD Seized as Drug Network Expands to Rural Zones: पाहता पाहता अंमली पदार्थ असलेले एम.डी पावडर नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाऱ्यासारखे पोहचत आहे. नागपूर शहरासह नागपूर तालुका व ग्रामीणमधील कळमेश्वर तालुक्यात अंमली पदार्थांपासून दूर राहिलेले युवक आता एम.डी (मेथैम्पेटामिन) पावडरच्या व्यसनात अडकत आहेत.

नागपूर शहरातून ग्रामीण भागातही पावडची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असून, काही टोळ्यांकडून तरुणांना स्वस्त दरात ते उपलब्ध करून दिले जाते. नुकतेच गुन्हे शाखेच्या युनिट क्र,५ ने कारवाई करुन ५ लाख ४२ हजार रुपयांचे एम.डी.पावडर जप्त केल्याच्या घटनेवरुन ग्रामीण भागातील चिंता दिवसेंदिवस वाढत आहे.

यावर नियंत्रण गरजेचे

नशेच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, स्थानिक संस्थांनी व्यसनमुक्तीसाठी जनजागृती मोहीम राबवणे आवश्यक आहे. आरोग्य केंंद्रात सल्लागारांची नेमणूक, ग्रामसभांमध्ये व्यसनविरोधी ठराव हे उपाय अत्यावश्यक झाले आहेत.

पोलिसांची संयुक्त तपास मोहीम नागपूर ग्रामीण पोलिस, विशेष शाखा आणि अंमली पदार्थविरोधी पथकाने एकत्रित तपास सुरू केली असून, लवकरच मोठे जाळे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात एम.डी. पावडरची वाढती व्याप्ती ही गंभीर सामाजिक व आरोग्य समस्या आहे. वेळेत पावले उचलली नाहीत, तर ही समस्या भयावह रूप धारण करू शकते.

लाखोंचा मुद्देमाल जप्त

नुकतीच मुंशी गल्लीतून साजिद अली उर्फ सज्जू हाफिज अली व शेख अमिन शेख रशीद या दोघांना तालुक्यातून अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून ५.४२ लाख रुपये किंमतीचे ९०.४४ ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आले. गुन्हे शाखेच्या युनिट क्र. ५ ने ही कारवाई केली. त्यांच्या चौकशीतून पोलिसांना ग्रामीणमधील विक्रीचे धागेदोरे सापडले आहेत.

आरोग्यावर परिणाम

एमडी पावडरमुळे मानसिक विकृती, चिडचिड, झोपेचा अभाव, आत्महत्येचे विचार यासारखे परिणाम होतात. या व्यसनामुळे ग्रामीण भागातील तरुण शैक्षणिक व सामाजिक मार्गांपासून भरकटत आहेत. शहरातील टोळ्यांचे ग्रामीण क्षेत्रात जाळे, नागपूर व अकोल्यातील टोळ्यांनी गावागावात एजंट तयार केले असून, हे एजंट तरुणांना आधी नशेच्या गर्तेत ओढतात व नंतर त्यांच्याच हातून विक्री करवून घेतात.

'पार्टी ड्रग'ची गावांमध्ये घुसखोरी

पूर्वी मोठ्या शहरांतील पार्ट्यांपुरता मर्यादित असलेला ''हाय क्लास'' प्रकार आता कुरिअर व दूचाकी गाड्यांद्वारे गावांमध्ये सहज पोहोचत आहे. गावातील तरुणांमध्ये एम.डी.च्या वाढत्या व्यसनाचे ग्रामीण भागातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही तरुण शेतीकाम टाळत असून, घरातील पैसे चोरी, गैरवर्तन यासारखी लक्षणे त्यांच्यात दिसून येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com