

Nagpur News
esakal
नागपूर: जुना गाव सुटला, अन् नव्या गावात काय सोय नाय जी... पान्याची वानवा, बिमार पडलो तरी डाक्टर डोऱ्याले दिसत नाय. पोरायले शिकाले एकच अंगणवाडी हाय, पोरायले कोस भर दूर धाडावं लागते. मानूस खपला तरी त्याले जाराले कोसभर दूर न्या लागते. सरकारने पुनर्वसन तर केला, पण सोयी काहीच दिल्ल्या नाय... या प्रतिक्रिया होत्या टेकेपार येथील नागरिकांच्या. ज्यांचे जुन्या गावातून नवीन गावात पुनर्वसन करण्यात आले.