esakal | दादागिरी करणाऱ्या दबंग तरूणीचा भर चौकात खून; नागपुरातील थरकाप उडवणारी घटना
sakal

बोलून बातमी शोधा

crime

दादागिरी करणाऱ्या दबंग तरूणीचा भर चौकात खून; नागपुरातील थरकाप उडवणारी घटना

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर ः वस्तीत दबंगगिरी करीत अनेकांना दमबाजी करणाऱ्या २६ वर्षीय तरुणीचा दोघांनी भरचौकात चाकूने भोसकून खून केला. ही थरारक घटना आज सोमवारी दुपारी पाचपावलीतील तांडापेठेत घडली. पिंकी वर्मा असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे वस्तीत दहशत निर्माण झाली आहे.

हेही वाचा: नागरिकांनो, वर्धा जिल्ह्यातील बॅंकाच्या वेळा बदलल्या; दुपारी 2 वाजेपर्यंतच चालणार कामकाज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंकीचे आईवडील राजनांदगाव येथे राहतात. तिचा भाऊ वाठोडा येथे राहतो. पिंकीचे तांडापेठ येथे घर असून जास्त करून ती मैत्रिणीकडेच राहत होती. पिंकी वस्तीत दादागिरी करीत होती. अवैध धंदे करणाऱ्यांना ती धमक्या देत होती. अवैध धंदे बंद करण्यासाठी ती एकटीच जायची. तसेच परिसरातील आटोचालक, रिक्षाचालक यांनाही दमबाजी करीत होती. ती मुलांप्रमाणे राहत होती. सध्या ती कॉम्प्युटर क्लास करीत होती.

सोमवारी दुपारी दोन वाजता पिंकी तांडापेठ, बन्सोडा चौकात उभी होती. दरम्यान दोन आरोपी युवक तिच्याजवळ आले. तिच्याशी दोघांची शाब्दीक चकमक झाली. त्यानंतर आरोपींनी चाकूने तिच्या छातीवर सपासप वार केले. त्यामुळे ती खाली पडली. रक्ताच्या थारोळ्यात ती खाली पडताच दोन्ही आरोपी पळून गेले. पाचपावली पोलिसांचा ताफा घटनास्थळी गेला. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला.

हेही वाचा: सरन्यायाधीशांनी बाबासाहेबांच्या 'त्या' प्रस्तावाचा पुरावा द्यावा : डॉ. प्रदीप आगलावे

‘गेम’ करण्याची मिळाली होती धमकी

मुलांप्रमाणे वागणारी पिंकीने अनेकांशी पंगा घेतला होता. त्यातूनच चार दिवसांपूर्वी तिचा वस्तीतील दोन जणांशी वाद झाला होता. त्यांनी पिंकीला ‘गेम’ करण्याची धमकी दिली होती. यासोबतच पिंकीचे अनेकांशी खटके उडाले होते. तसेच अनेकांशी पैशावरून वादही होते. त्यामुळे तिच्या दादागिरीमुळे तिचा ‘गेम’ करण्यात आला असावा, अशी चर्चा आहे.

संपादन - अथर्व महांकाळ