esakal | नागपुरातील अजनीत १६ वर्षीय मुलीवर अत्याचार; प्रियकराने दिला धोका

बोलून बातमी शोधा

crime
नागपुरातील अजनीत १६ वर्षीय मुलीवर अत्याचार; प्रियकराने दिला धोका
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नागपूर ः अजनीत राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीचे चौघांनी दुचाकीने अपहरण केले. तिला पडक्या घरात नेऊन चौघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही थरारक घटना गुरूवारी दुपारी अडीच वाजता उघडकीस आली. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून १७ वर्षांच्या दोघांना ताब्यात घेतले आहे. वैभव ज्ञानेश्वर घोडेस्वार (२०) आणि अमन सुनील नागदिवे (१८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पीडित मुलीची कौशल्यानगर येथे राहणाऱ्या वैभव घोडेस्वारसोबत ओळख होती. शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास वैभवने मुलीच्या मोबाईलवर फोन साधून फिरायला जाऊ असे म्हटले. त्यानंत सकाळी ११ च्या सुमारास वैभव हा एका मित्रासोबत दुचाकीने मुलीच्या घराजवळील मैदानाजवळ आला. तेथून त्याने मुलीला फोन केला. मुलीला दुचाकीवर बसवून एका मित्राच्या मावसभावाच्या अजनी रेल्वे वसाहत येथील क्वॉर्टरवर नेले.

त्याठिकाणी आधीपासूनच अमन आणि एक मित्र त्यांची वाट पाहत घरात दबा धरून बसले होते. त्यानंतर चौघांनीही तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. सामूहिक बलात्कार केल्यानंतर एका विधी संघर्षग्रस्त मुलाने दुपारी तीनच्या सुमारास तिला तिच्या घराजवळ आणून सोडले. या प्रकरणी अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वैभव आणि पीडित मुलीचे प्रेम होते. त्याने तिला मौजमजा करण्यासाठी सोबत चलण्यास तयार केले होते. मात्र वैभवने अन्य तिन मित्रांनाही बोलावून घेतले होते. तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्याचा कट प्रियकर वैभवनेच आखला होता. त्यामुळे प्रियकरानेच धोका दिल्याने प्रेयसीचे आयुष्य उध्वस्त झाले.

संपादन - अथर्व महांकाळ