Mental Health Recovery : प्रादेशिक मनोरुग्णालयात दोन वर्षे अनोळखी म्हणून उपचार घेतलेल्या तरुणीची खरी ओळख उघडकीस आली आहे. तिचे नाव प्रार्थना मोजूमदार असून ती मूळची बांगलादेशातील आहे.
नागपूर : मानसिक विकाराच्या गर्तेत सापडलेली एक अनोळखी तरुणी... स्वतःचे नाव, मूळ गाव, कुटुंब काहीच ठाऊक नाही. पाय चालले आणि ती मजल दरमजल करत कशी बांगलादेशातून भारतात आली, हे तिलाही आठवत नाही.