
उमरेड : जिल्ह्याचा उमरेड तालुक्यात शुक्रवारी पहाटे चार वाजता अवकाशातून एक धातूचा तुकडा घरावर पडल्याने परिसरात खळबळ उडाली. कोसे ले आऊट परिसरात आकाशातून पडलेला धातूचा तुकडा हा अवकाश कचऱ्याचा भाग असून एखाद्या रॉकेटचा तुकडा असावा, अशी शक्यता खगोलशास्त्राचे अभ्यासक व स्काय वाच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी वर्तविली.