
तुषार पिल्लेवान
नागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगाराची हमी देणारी महत्त्वाची योजना आहे. मात्र, काही वर्षांपासून निधीच्या तुटवड्यामुळे या योजनेची अंमलबजावणी अडचणीत आली आहे. राज्यात मनरेगाअंतर्गत झालेल्या विविध कामांचे तब्बल २,२३० कोटी रुपये थकित आहेत. मागणीच्या तुलनेत तुटपुंजा निधी मिळत असल्याने स्थानिक यंत्रणांना कामे पूर्ण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.