नागपूर - नेहरूनगर झोनअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ३० मध्ये मोठा उलटफेर झाला. एमआयएमच्या तीन उमेदवारांनी अनपेक्षितपणे भाजपच्या ताब्यात असणाऱ्या जागांवर विजय मिळविला. या प्रभागात संजय महाकाळकर यांनी पुन्हा विजय मिळवीत काँग्रेसची बूज राखली. .प्रभाग ३० अ मधून एमआयएमच्या वर्षा डोंगरे यांना ११ हजार ९८७ मते मिळाली तर भाजपाच्या पायल कुंदेलवार यांना १० हजार ८७५ मते मिळाली. डोंगरे फक्त ३१२ मतांनी विजयी ठरल्या. ओबीसी संवर्गामधून एमआयएमचे मंसुरी इसाक मोहम्मद यांना ११ हजार १६८ मते मिळाली, तर काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक संजय महाकाळकर यांना ११ हजार ८११ मते मिळाली. त्यांनी ६४३ मतांनी विजय मिळविला..सर्वसाधारण महिला गटातून एमआयएमच्या तसनीम परवीन नियामत खान ताजी यांनी १० हजार ५३८ मते घेतली, तर काँग्रेसच्या सीमा राऊत यांना ९ हजार ३७७ मते मिळाली. भाजपाच्या स्नेहल बिहारे यांना ७ हजार ३४१ मते मिळाली. तसनीम कान यांनी १ हजार ११५ मतांनी विजयी ठरल्या.सर्वसाधारण गटातून एमआयएमचे अब्दुल करीम अब्दुल गफ्फार यांनी १० हजार ९४७ मते मिळवीत भाजपाचे अजय खळतकर यांच्यावर २ हजार ४७० मतांनी मात केली..मुस्लिम मतदारांना गृहीत धरणे भोवलेकाँग्रेसचे पारंपरिक मतदार म्हणून सातत्याने मुस्लिम समाजाकडे बघितले जाते. काँग्रेसच्या उमेदवारांना त्यांची मते मिळतात हा नेहमीचा ‘कॉन्फिडन्स’ यंदा चांगलाच नडला. प्रभाग ३० आणि प्रभाग २७ च्या मुस्लिम मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवारांना चांगलाच झटका दिला. यातून प्रभाग २७ मधून काँग्रेसचे सर्व उमेदवार पडले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.