
कामठी : जनसंवाद दौऱ्यादरम्यान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येरखेडा येथे जनतेशी संवाद साधला. यावेळी उपस्थित सर्वांचे प्रश्न व समस्या समजून घेतल्या. एकंदर २९८ निवेदने स्वीकारली. तसेच प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. येरखेडा नगरपंचायतचा डीपी प्लान तत्काळ तयार करा.