Miracle Well sakal
नागपूर
Miracle Well : दीडशे घरांची तहान भागविते चमत्कारी विहीर; दिवसरात्र चालतात ५० मोटारपंप, परिसरात चर्चेचा विषय
Nagpur News : नागपूरच्या गोधनी येथील बंबलेश्वरीनगरात एक विहीर उन्हाळ्यातही अखंडपणे १५० घरांना पाणीपुरवठा करते आहे. दिवसरात्र ५० मोटारपंप चालूनही विहीर आटत नाही, त्यामुळे ती परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.
नागपूर : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये असंख्य नागरिक पाण्यासाठी भटकंती करतानाचे चित्र जागोजागी पाहायला मिळते. ठिकठिकाणच्या विहिरी व नद्या आटत चालल्या आहेत. मात्र शहराच्या वेशीवर असलेल्या गोधनी परिसरातील बंबलेश्वरीनगरात अशी एक अनोखी विहीर आहे, जी भर उन्हाळ्यातही दीडशे घरांची तहान भागवित आहे. ही चमत्कारी विहीर परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.

