esakal | आमदार रवी राणा यांना उत्तर दाखल करण्याची शेवटची संधी : उच्च न्यायालय
sakal

बोलून बातमी शोधा

Ravi-Rana

आमदार रवी राणा यांना उत्तर दाखल करण्याची शेवटची संधी

sakal_logo
By
केतन पळसकर

नागपूर : बडनेऱ्याचे (जि. अमरावती) आमदार रवी राणा यांच्या विरोधात दाखल याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शेवटची संधी दिली आहे. यावर दोन आठवड्यांमध्ये उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. रवी राणा यांची निवडणूक रद्द करण्यात यावी, या विनंतीसह मतदार सुनील भालेराव खराटे यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

याप्रकरणी न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार ऑक्टोबर २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार राणा यांनी लोकप्रतिनिधीत्व कायद्यातील तरतुदी व भारतीय निवडणूक आयोगाच्या दिशानिदेर्शांचे उल्लंघन करून विजय मिळवला. विधानसभा निवडणुकीमध्ये एक उमेदवार जास्तीत जास्त २८ लाख रुपयांपर्यंत खर्च करू शकतो. परंतु, आमदार राणा यांनी या मयादेर्पेक्षा जास्त खर्च केला.

हेही वाचा: Video : बस पुरात वाहून गेली; चौघे बुडाले, तिघांचे मृतदेह सापडले

जिल्हा निवडणूक खर्च देखरेख समितीच्या चौकशीमध्ये राणा यांनी खर्चाच्या नियमाचे उल्लंघन केल्याचे आढळून आले होते. मागील सुनावणी दरम्यान न्यायालयाने नोटीस बजावत उत्तर दाखल करण्याचे आदेश प्रतिवाद्यांनी दिले होते. दोन वेळा वेळ वाढवूनही उत्तर दाखल न केल्याने न्यायालयाने आता रवी राणा आणि निवडणूक आयोगाला शेवटची संधी दिली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. ओमकार घारे, अ‍ॅड. ए. एम. घारे, आयोगातर्फे अ‍ॅड. निरजा चौबे यांनी बाजू मांडली.

loading image
go to top