सुटता सुटेना मुलांचा मोबाईल! | Online Class | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Online Class
सुटता सुटेना मुलांचा मोबाईल!

सुटता सुटेना मुलांचा मोबाईल!

नागपूर : लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन (online class) क्लासेससाठी मुलांना स्मार्टफोन(smartphone) दिला. मात्र, आता ते फोन सोडायला तयार होईनात. मोबाईल बाजुला ठेवायला सांगितला की ते आक्रमक होतात. खाणे-पिणे विसरून मोबाईलमध्ये तासंतास ते खरोखर अभ्यास करताहेत की दुसरं काय करताहेत, अशा प्रश्नांनी तुमच्या मनात गोंधळ निर्माण केला असेल. या द्विधावस्थेतून मार्ग काढण्यासाठी तुम्ही धडपडत असणारच!

अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल?

  • मुलांना स्मार्टफोनपासून दूर करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला स्वतःचा स्क्रिनटाईम कमी करावा लागेल. यासाठी मुलांसमोर मोबाईलचा वापर करने शक्यतो टाळा. मुलांना शिस्त लागावी म्हणून आपल्यालाही अशी बंधने पाळावी लागतील.

  • मुलांसोबत क्वालिटि टाईम स्पेंड करा. आपला पूर्ण वेळ त्यांना द्या. त्यांच्यासमोर वाचन, लिखान करा आणि त्यांनाही असे करण्यास प्रोत्साहित करा. खूपच कमी वयाचे असतील तर विविध गोष्टी, कविता त्यांना सांगा.

  • विशिष्ट वेळेत मोबाईल वापरायचा नाही. किंवा नेट वापरायचा नाही, असे प्राथमिक उपाय घरातल्या घरात राबवा. रिकमांडेड स्क्रिनटाईम पुरताच मोबाईल वापरण्याचा पायंडा घाला.

  • एखादा आऊटडोर गेम खेळण्यास मुलांना प्रोत्साहित करा. ज्यामुळे ते मोबाईल सोडून बाहेच्या वातावरणात वावरतील.

  • मोबाईलमध्ये कोणते गेम खेळायचे कोणते खेळू नये. हे आधीच ठरवून द्यावे. वेगळा मोबाईल घेऊन देण्याऐवजी आपल्यापैकी कुणाचा मोबाईल ठराविक वेळेपुरताच मुलांना द्यावा.

  • एकांतात मोबाईल वापरू देऊ नये. आपल्या समोरच मोबाईल वापरण्यास सांगावे. एकवेळ तुम्हाला वाटेलही की आपण त्यांना बंधनात तर ठेवत नाही ना? मात्र, चांगलं पेरलं की चांगलचं उगवतं. मुलं अनुकरणातून शिकतात. त्यासाठी पालक म्हणून आपल्याला अनुकूल वातारवण तयार करावे लागेल.

वयानुसार मुलांचा स्क्रिनटाईम किती असावा?

  • वय स्क्रिन टाईम प्रति दिवस

  • दोन वर्षापर्यंत शुन्य तास

  • दोन ते पाच वर्ष १ तासांपेक्षा जास्त नसावा

  • पाच ते १७ वर्ष २ तासांपेक्षा जास्त नसावा (ऑनलाइन क्लासेस वगळून)

  • मोबाईलच्या अतिवापरामुळे बालकांवर होणारे दुष्परिणाम

  • स्क्रिनिंग टाईममुळे लठ्ठपणा

  • मानसिक आरोग्यावर दुष्परीणाम

  • लहान वयातच निद्रानाश

  • मेंदूच्या विकासात बाधा

"मोबाईलच्या अती वापरामुळे मुलांच्या डोळ्यावर परिणाम होत आहे. मुलांमध्ये डिप्रेशन लेवल वाढत आहे. रुग्णालयात येणारे ६ ते ७ टक्के रुग्ण या समस्येशी झुंजत आहेत. मुलांमध्ये स्पॉंडेलिसिसचा आजार वाढत आहे."

- डॉ. अविनाश गावंडे, अधिक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर.

टॅग्स :Nagpurmobile