पतींनो सावधान! पत्नी ठेऊ शकते मोबाईलमध्ये गुप्तहेर

स्पायवेअर मोबाईलमध्ये इंस्टॉल झाल्यानंतर मोबाईलचा ताबा दुसऱ्या व्यक्तीकडेही जाते
mobile
mobile mobile

नागपूर : पती आपल्याशिवाय इतरत्र कुठे गुंतला आहे का? किंवा पती कुणा कुणाच्या संपर्कात असतो, याची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता पत्नीला असू शकते. त्यासाठी तीला गुप्तहेर (Spyware) ठेवण्याची गरज नाही तर स्पायवेअरच्या माध्यमातून ती माहिती गोळा करू शकते. बाजारात सहजरित्या उपलब्ध असलेले ते सॉफ्टवेअर (Software) पतीच्या मोबाईलमध्ये (Mobile) ठेवता येते. त्यामुळे पतींनो... सावधान!

अनेक कारणांसाठी (Used for many purposes) आपला मोबाईल स्पायवेअरद्वारे हॅक करून हेरगिरी होण्याची शक्यता आहे. सध्या स्पर्धेचे युग असून आपला प्रतिस्पर्धी काय करतो? कसा करतो? आणि त्याचा पुढचा प्लान काय? हे जाणून घेण्याची अनेकांनी उत्सुकता असते. त्याचप्रमाणे राजकीय नेते, व्यापारी, प्रियकर-प्रेयसी, किंवा पती-पत्नीसुद्धा जोडीदाराच्या हालचालींवर लक्ष ठेवून गुपिते जाणून घेण्यासाठी या स्पायवेअरचा गैरवापर करू शकतात.

mobile
उर्वशी रौतेलाचा हॉट अवतार; चाहत्यांना लावते वेड

हे स्पायवेअर मोबाईलमध्ये इंस्टॉल झाल्यानंतर मोबाईलचा ताबा दुसऱ्या व्यक्तीकडेही जाते. त्यामुळे आपल्याला येणारे टेक्स्ट मॅसेज, व्हॉट्सॲप, फेसबुक मॅसेज, मोबाईलवर येणाऱ्या जाणाऱ्या कॉलची माहिती आणि रेकॉर्डिंग, मोबाईल मधील फोटो-व्हिडिओ या सर्व बाबीची माहिती मिळू शकते. तसेच मोबाईलमध्ये काय सर्च केले, सध्याचे चालू लोकेशन देखील मिळते. यामध्ये सर्वात धोकादायक आहे ते म्हणजे बॅंकेचे व्यवहार, ते देखील दुसऱ्याच्या ताब्यात जाऊ शकतात. त्यामुळे या स्पायवेअरमुळे सामाजिक, आर्थिक, आणि वैयक्तिक धोक्यात येवू शकते. दुसरीकडे संबंध असणाऱ्यांची पोलखोल होऊ शकते आणि संसारात विघ्न येऊ शकतात.

कशासाठी होऊ शकतो गैरवापर

  • व्यक्तीगत माहिती काढण्यासाठी

  • स्वतःचा आर्थिक व राजकीय गैरफायद्यासाठी

  • अन्य कुणाचे नुकसान-बदनामी करण्यासाठी

  • वैमनस्यातून बदला घेण्यासाठी

  • खोडसाळपणा किंवा गंमत करण्यासाठी

mobile
‘उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिरवा झेंडा हाती धरला’

यामुळे होऊ शकते हॅकिंग

  • अनोळखी क्रमांकावरून आलेली लिंक उघडल्यास

  • असुरक्षित, अनट्रस्टेड, वेबसाइटवर पाहिल्यास

  • पोर्नोग्राफीक वेबसाइटवरून सर्च करीत असताना

  • वेबसाइटवर आपोआप येणारे पॉपअप क्लिक केल्यावर

  • ऑनलाइन गेम खेळताना

  • पायरेटेड मूव्ही डाऊनलोड केल्याने

  • टार्गेट करू इच्छिणाऱ्या व्यक्तीने फोन हाताळल्यास

मोबाईल हॅकिंग एक गुन्हा

पत्नीने किंवा पतीने किंवा कोणीही कुणाच्याही मोबाईल फोनचा अनधिकृत ताबा घेणे किंवा मोबाईलची हॅकिंग करणे हे गैरकायदेशिर आहे. हॅकिंगमुळे खासगी आयुष्याला बाधा पोहचू शकते. त्यामुळे कुणी असे प्रकार केल्यास तर त्याला माहिती तंत्रज्ञान अधिनियमाचे कलम ४३ (ए) आर/डब्ल्यू ६६ अन्वये तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा आणि पाच लाख रुपयाचा दंड होवू शकतो.

अनोळखी आणि आकर्षित करणारे पॉपअप्स-लिंक्स उघडू नये. दुसऱ्याच्या हातात फोन देताना स्वतः लक्ष ठेवा. ज्या वेबसाइट https ने सुरू होतात त्या सुरक्षित तर केवळ http ने सुरू होणाऱ्या असुरक्षित असतात. आपले मोबाईल सॉफ्टवेअर सिस्टीम आणि ॲप्स अपडेट्स करत रहा. अधून मधून मोबाईलचे 'प्ले स्टोर' वरून 'प्ले प्रोटेक्ट' द्वारे स्कॅन करावे, धोकादायक ॲप्स दाखविल्यास ते डिलीट करून मोबाईल सुरक्षित करावा.
- केशव वाघ, सायबर क्राईम, नागपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com