

Nagpur News
esakal
नागपूर: निवडणुक आली की, नगरसेवक आणि उमेदवार नळ कनेक्शन देण्याचे आमिष दाखवितात. आमचे आधार कार्ड, फोटो आणि इतरही कागदपत्रे घेऊन गेलेत. मात्र, नळ कनेक्शन काही दिले नाही. कित्येक निवडणुका होऊन गेल्यात. मात्र, आमच्या नशिबी केवळ टँकरचेच पाणी आहे. पिण्यासाठी हेच पाणी नाइलाजाने वापरावे लागत असल्याचा संताप मॉडेल मिल चाळीतील नागरिकांनी व्यक्त केला.