रेल्वे स्थानकावर लवकरच आधुनिक ‘व्हीएसएस’ प्रणाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

railway

रेल्वे स्थानकावर लवकरच आधुनिक ‘व्हीएसएस’ प्रणाली

नागपूर - प्रवाशांची सेवा आणि सुरक्षिततेसाठी रेल्वे मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. त्याच्याच भाग म्हणून नागपूर मध्यवर्ती स्थानकावर लवकरच आधुनिक व्हिडीओ सर्व्हिलन्स सिस्टीम (व्हीएसएस) बसविण्यात येणार आहे. याचा प्रस्ताव मध्य रेल्वे विभागाला मिळाला असून लवकरच काम युद्धपातळीवर सुरू होणार आहे. ही यंत्रणा राज्यातील ११० स्थानकांवर लवकरच कार्यान्वित होईल.

रेलटेलकडून व्हीएसएस प्रणाली प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी असेल. या अंतर्गत रेल्वे स्थानकातील फलाटावरील मोक्याच्या ठिकाणी पॅनिक बटण उभारण्यात येतील. याची जोडणी स्थानकांतील सीसीटीव्ही आणि रेल्वे सुरक्षादलाच्या चौकीत देण्यात येईल. हे बटण दाबताच याचा अलर्ट दोघांनाही मिळेल. यामुळे तातडीने सुरक्षा दलाकडून मदत मिळेल. दरम्यान, रेल्वे सुरक्षा दलाचा जवान घटनास्थळी दाखल होईपर्यंत पॅनिक बटण लावलेल्या ठिकाणाकडे सीसीटीव्ही झूम होऊन व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू करेल, अशी रचना यात आहे.

रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नेमक्यावेळी हेल्पलाइन व्यस्त असते, पोलिस वेळेवर उपलब्ध नसताता असा अनुभव प्रवाशांना येतो. यामुळे प्रवाशांना मदत मिळवण्यात अडचणींना तोंड द्यावे लागते. यावर उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने रेल्वे फलाटांवर पॅनिक बटण कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. व्हीएसएस योजनेंतर्गत रेल्वे स्थानकावरील प्रतीक्षालय, आरक्षण काउंटर, पार्किंग क्षेत्र, मुख्य प्रवेश व निर्गमन, प्लॅटफॉर्म, फूट ओव्हरब्रिज, बुकिंग ऑफिस इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे.

निर्भया फंड अंतर्गत प्रकल्प

नागपूर विभागातील ६ रेल्वे स्थानकांमध्ये बल्लारशाह, चंद्रपूर, बैतूल, धामणगाव, सेवाग्राम आणि वर्ध्याचा समावेश आहे. भारतीय रेल्वे आणि रेलटेलद्वारे हा प्रकल्प निर्भया फंड अंतर्गत राबविण्यात येत आहे. हा प्रकल्पाचा पहिला टप्पा असून यात ए १,बी आणि सी श्रेणीतील रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात येणार आहे. येत्या जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

अशी असेल यंत्रणा

  • आधुनिक व्हीएसएस प्रणाली झुममध्ये दूरवरील चित्र दिसणार स्पष्ट

  • व्हिडीओ रिकॉर्डिंगचा डाटा मिळणार प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य

  • स्थानकावरील प्रत्येक बारिक हालचीलीवर नजर

  • फलाटावर मोक्याच्या ठिकाणी पॅनिक बटन विभागातील ६ स्थानकांचा समावेश

आधीपासून स्थानकावर व्हीएसएस प्रणाली कार्यान्वित आहे. मात्र, नवीन आधुनिक पद्धतीच्या व्हीएसएस प्रणालीचा प्रस्ताव आला आहे. त्याबाबत लवकरच निर्णय होऊन काम सुरू होईल.

- विजय थूल, मंडल वाणिज्य प्रबंधक व जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

Web Title: Modern Vss System At Railway Stations Soon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..