प्रत्येक मशिदीत शिवलिंग का शोधताय? मोहन भागवतांनी खडसावलं!

Mohan Bhagwat said, We have nothing to say on the issue of temples
Mohan Bhagwat said, We have nothing to say on the issue of templesMohan Bhagwat said, We have nothing to say on the issue of temples

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीतील चित्रीकरणावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी यावर परस्पर सामंजस्याच्या माध्यमातून तोडगा काढण्यात यावे असे नमूद केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचा समारोपीय सोहळा रेशीमबाग मैदानावर गुरुवारी पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरामचंद्र मिशनचे कमलेश पटेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत संघ चालक राम हरकरे, सर्वाधिकारी, माजी न्यायाधीश अशोक पांडे, नागपूर महानगर संचालक राजेश लोया उपस्थित होते. या सोहळ्यात स्वयंसेवकांनी प्रदक्षिणा संचलन, शारीरिक प्रदर्शन, सांघिक गीत आदींचे सादरीकरण केले.

सध्या हिंदू आणि मुस्लिम पक्षकारांनी या वास्तूवर दावा सांगितला आहे. काही स्थळांबाबत आपल्या मनात विशेष आस्था आहे, आपण त्याबाबत बोलतो देखील. परंतु, आपण रोज नवीन मुद्दा आणता कामा नये. मुळात हा वादच आपण कशासाठी वाढवीत आहोत? ‘ज्ञानवापी’बाबत आपल्या मनात आस्था आहे, जे योग्य आहे ते आपण करीत आहोत. परंतु, प्रत्येक मशिदीमध्ये शिवलिंग कशासाठी शोधत आहोत? असा सवालही डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी उपस्थित केला.

तरच विश्‍वगुरू होऊ शकू

जगामध्ये वावरताना समन्वय आणि एकता महत्त्वाची आहे. दहशतवाद्यांमध्ये एकता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. आपले साधुसंत कधीही एकत्रित येऊन बसू शकत नाही. तीन हजारपेक्षा जास्त जाती आपल्या देशात आहे. सर्वधर्म एकजूट होत नसल्यास आपण आपल्या भारत मातेचा जयजयकार कसा करू शकू? जगावर स्वार व्हायचे असल्यास एकतेसह बौद्धिक व आध्यात्मिक बाबी गरजेच्या आहेत. मात्र, सर्वांचा समन्वय असल्याशिवाय आपण विश्‍वगुरू होऊ शकणार नाही, असे कमलेश पटेल म्हणाले. माजी न्यायाधीश अशोक पांडे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com