
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकत्याच झालेल्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मोरोपंत पिंगळे यांच्या आयुष्यावर आधारित मोरोपंत पिंगळे: द हिंदू आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्चर या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी बोलताना भागवत यांनी मोरोपंत पिंगळे यांच्या पंचहात्तरीच्या शालीबाबत केलेल्या वक्तव्याची एक आठवण सांगितली, ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.