धनत्रयोदशीचा मुहूर्त : तीनशे किलो सोन्याची विक्री

जिल्ह्यात सरासरी सर्वच साहित्यांची ५०० कोटीची उलाढाल झाली
gold
goldsakal
Updated on

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्याने धनत्रयोदशीला सोने व चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांचा अपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे. सराफ बाजारात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सोने व चांदीच्या दागिन्यांच्या विक्रीत २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली. सोने व चांदीचे दर कमी असल्याने ग्राहकांनी खऱ्या अर्थाने खरेदीची दिवाळी साजरी केली. त्यामुळे धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर जिल्ह्यात अंदाजे तीनशे किलो सोन्याची विक्री झाल्याचा अंदाज आहे. तसेच जिल्ह्यात सरासरी सर्वच साहित्यांची ५०० कोटीची उलाढाल झाल्याचे बोलले जात आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षी सर्वच सणाची चमक फिकी पडली होती. दिवाळीतही ग्राहकांच्या मनात कोरोनाची भीती कायम होती. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याने चांगले वातावरण उत्साही झालेले आहे. राज्य सरकारने निर्बंध शिथिल केल्याने बाजारपेठ पूर्वपदावर आली आहे. सराफ बाजार आता पूर्वीच्या तुलनेत सावरला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर सोने व चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती.

दिवाळी धामधूम सुरु झाली असून धनत्रयोदशीचे मुहूर्त साधत अनेकांनी सोने, चांदीच्या खरेदीसह वाहने, इलेक्ट्रॉनिक्स साहित्य, हक्काचे घर खरेदीसाठी गर्दी केली होती. सराफा शोरुमसह मॉलमध्ये बिलींग करण्यासाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेकांनी खरेदीचा मुहूर्त साधला. ही खरेदी भाऊबिजपर्यंत कायम राहणार आहे. पुढे लग्नसराई येत असल्याने सराफ बाजारातील उलाढाल वाढतच जाईल, असा अंदाज आहे.

धनत्रयोदशीला सोने खरेदीसाठी उत्साह होता. यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत सोने तीन हजाराच्या जवळपास घसरलेले आहेत. गेल्यावर्षी नोव्हेंबर २०२० मध्ये सोन्याचे दर ५१ हजार ५०० होते. मात्र, यावर्षी सोन्याचे दर ४८ हजार ४०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. हीच संधी साधून गुंतवणूकदार आणि सर्वसामान्य नागरिक सोने खरेदीला महत्त्व देत आहेत. धनत्रयोदशीच्या दिवशी यंदा विक्रमी खरेदी झाली असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर विक्रमी सोने खरेदी झालेली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पटीने सोन्याची विक्री झाली आहे. त्याचे कारण म्हणजे सोन्याचे दर कमी आणि अनेक दिवसापासून थाबलेली दागिने खरेदी आहे. धनत्रयोदशीला सोन्याचे दागिने, सोन्याचा तुकडा किंवा शिक्के खरेदीला पसंती दिली आहे.

- राजेश रोकडे, संचालक, रोकडे ज्वेलर्स.

सोन्याचे दर ग्राहकांना परवडतील असे आहेत. त्यामुळे धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत ग्राहकांनी दागिने खरेदीचा आनंद लुटला. एन्टीक, डायमंड आणि प्लॅटिनम ज्वेलरीला ग्राहकांकडून चांगली मागणी चांगली होत होती. ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत होते.

- सीए. हर्षल सुधीर दारोडकर्स, संचालक दारोडकर्स मेहेर ज्वेलर्स

कोरोना कमी झाल्यानंतर यावर्षी ग्राहकांनी दसरा व त्यानंतर गुरुपुष्यामृत योग मुहूर्तावर सोने खरेदीला पसंती दिली. आता धनत्रयोदशीला त्यापेक्षाही चांगली खरेदी झालेली आहे. जिल्हयात अंदाजे ३०० किलो सोन्याची विक्री झाली असावी.

- पुरुषोत्तम कावळे, अध्यक्ष सराफा असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com