Nagpur Accident : सोमवार ठरला नागपूरसाठी ‘अपघात’वार; तीन ठिकाणी उलटल्या कार, २ ठार, १० जखमी
Accident News : सोमवारी वाडी व पारशिवनी परिसरात तीन ठिकाणी कार अपघात झाल्याने दोन जणांचा मृत्यू तर १० जण जखमी झाले. नवनीतनगरमधील भट कुटुंबातील एका ज्येष्ठ व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
वाडी/पारशिवनी : जिल्ह्यात विविध ठिकाणी घडलेल्या तीन अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर दहा जण जखमी झाले. यातील दोन घटना जबलपूर महामार्गावर तर एक घटना शहरातील सीताबर्डी पोलिस हद्दीत घडली.