
कोंढाळी : ‘मॉर्निंग वॉक’ करुन घरी परत जाणाऱ्या व्यक्तीवर एका पिता-पुत्राने जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले. कोंढाळी पोलिसांनी या आरोपी पिता-पुत्राला अटक केली. संजय शंकरराव आष्टणकर (वय ५६, कोंढाळी) असे गंभीर जखमी फिर्यादीचे नाव आहे. कोंढाळी येथील प्रतिष्ठीत नागरिक संजय आष्टणकर हे नेहमीप्रमाणे सकाळी पाचला फिरायला गेले.