
नागपूर : मातेने जन्म होताच बाळाला झाडाझुडपात फेकले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी बाळाला सोडून पलायन करणाऱ्या आईविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एसआरपीएफ कॅम्पमागे ज्ञानदीपनगरात रेणुका अपार्टमेंट आहे. त्या अपार्टमेंटमध्ये आशिष गहाणे (वय २७) हा चौकीदारी करतो. बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास त्याला अपार्टमेंटला लागून असलेल्या झाडाझुडपात कपड्यात काहीतरी गुंडाळलेले दिसले. त्याने जवळ जाऊन पाहिले असता नवजात पुरुष जातीचे अर्भक मृतावस्थेत असल्याचे दिसले. त्याने पोलिसांना माहिती दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत खराबे यांनी लगेच एएसआय दत्ता काळे यांच्या पथकाला घटनास्थळावर पाठविले. पोलिसांनी मृत अर्भकास ताब्यात घेतले. उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केले.
अशीही चर्चा
एमआयडीसी परिसरातील एका युवतीने हे नवजात अर्भक फेकले असून तिला अनैतिक संबंधातून गर्भधारणा झाली होती, अशी कुजबुज परिसरातील नागरिकांत सुरू होती. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
हेही वाचा : ‘मम्मी-पप्पा मुझे माफ करो’ असे म्हणत तिने संपवले जीवन.. पण असे काय घडले; जाणून घ्या
सीसीटीव्हीच्या फुटेजचा आधार
बाळाचा जन्म जवळपास १२ ते १६ तासांपूर्वी झाला असावा. त्यामुळे भुकेने त्याचा मृत्यू झाला असावा. परिसरात लागलेल्या सीसीटीव्हीच्या फुटेजची तपासणी पीआय खराबे यांची पथक करीत आहेत.
संपादन : मेघराज मेश्राम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.