एमपीसीबीचा महानिर्मितीला दणका

१२ लाखांची बॅंक गॅरंटी जप्त करण्याचे आदेश
MPCB order to forfeit bank guarantee of 12 lakhs to Mahanirmiti nagapur
MPCB order to forfeit bank guarantee of 12 lakhs to Mahanirmiti nagapurSakal

नागपूर - कोराडी औष्णिक वीज प्रकल्पातील राख बांध फुटीच्या प्रकरणात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने (एमपीसीबी) महानिर्मितीला दणका देत १२ लाखांची बॅंक गॅरंटी जप्त करण्याचे आदेश दिले. तसेच नव्याने २५ लाखांची बॅंक गॅरंटी भरण्याचे आदेश दिले.

कोराडी औष्णिक वीज प्रकल्प केंद्रालगतचा खसाळा राख बंधारा शनिवारी सकाळी फुटला. यातील लाखो टन राख वाहून गेली आहे. ही राख मिश्रित पाणी खसाळा, मसाळा, खैरी गावातून परिसरातील नदी, नाल्यात असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या शेतातही राख गेल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले.

खसाळा राख बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग करण्यासाठी विशिष्ट पाइपलाइनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. परंतु, या पाइपलाइनचे काम अद्यापही अपूर्ण आहे. या बंधाऱ्याचे देखभाल दुरुस्तीचे काम अभी कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. या बंधाऱ्याचे काम निकृष्ट झाल्याचा आरोपही अनेकांनी केला आहे.

या कामाची चौकशी करण्याची मागणी वारंवार संबंधित यंत्रणेकडे करण्यात आली होती. कामाचा दर्जा पाहून हा बंधारा फुटेल, अशी शक्यता यापूर्वीच व्यक्त करण्यात आली होती. मात्र, संबंधित कंत्राटदार, अधिकाऱ्यांना या घटनेचा अंदाज का आला नाही याबद्दलही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एमपीसीबीच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. प्रकल्पाच्या उभारणीच्या वेळी पर्यावरण विभागाच्या मंजुरीच्या वेळी घालण्यात आलेल्या अटींचे उल्लंघन महानिर्मितीने केले असून तलावाची उंची मंजूर क्षमतेपेक्षा अधिक केल्याचे एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले.

४७ हेक्टरमध्ये नुकसान

कोराडी विद्युत केंद्राच्या राख तलाव बांध फुटल्याने ४७ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले असून ७४ शेतकरी बाधित झाल्याची माहिती जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

कोराडी औष्णिक वीज केंद्र तयार करताना पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महानिर्मितीची १२ लाख रुपयांची बॅंक गॅरंटी जप्त करण्यात आली आहे. २५ लाख रुपये त्यांना नव्याने द्यायचे आहे.

- अशोक करे, प्रादेशिक अधिकारी, एमपीसीबी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com