Health News : संथ पचनक्रिया आहे तर अन्न चावून-चावून खा
Chewing and Oral Hygiene for Better Health : दंत चिकित्सक डॉ. बरखा राठी यांनी दातांच्या आरोग्याच्या महत्त्वावर भाष्य केले. त्यांनी संथ पचनक्रियेपासून बचाव करण्यासाठी अन्न चावून चावून खाण्याचा सल्ला दिला.
नागपूर : दात हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा, पण काहीसा दुर्लक्षित अवयव आहे. मात्र दात अशक्त असल्यामुळे दोनशे मिलियनपेक्षा अधिक लोकांना संथ पचनक्रियेचा सामना करावा लागतो. यामुळे लोकांना ऊर्जेची कमतरता सहन करावी लागते.