

MSEDCL announces its Abhay Scheme to provide relief to eligible electricity consumers in Nagpur district.
esakal
नागपूर: थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित झालेल्या नागपूर जिल्ह्यातील ९५ हजार ९४५ घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहक अभय योजनेत पात्र ठरले आहेत.
ग्राहकांच्या एकूण थकबाकीमधील संपूर्ण व्याजाची आणि विलंब आकाराची रक्कम १०० टक्के माफ करण्यात येणार आहे.