Crime News : सामूहिक अत्याचारानंतर 'ती' ची हत्या

चार अल्पवयीन मुलांची नागपूरच्या बालसुधारगृहात रवानगी; गोठणगाव येथील प्रकरण
Crime News
Crime Newssakal

गोंदिया ः देवरी तालुक्याच्या गोठणपार येथील घटनेचे दागेदोरे अखेर उलगडले असून, चार अल्पवयीन मुलांना पोलिसांनी शनिवारी (ता. २७) ताब्यात घेत त्यांची नागपूरच्या बालसुधारगृहात रवानगी केली आहे. या अल्पवयीन मुलांनी तिच्यावर वडेकसा जंगलात सामूहिक लैंगिक अत्याचार केल्यानंतर दगडाने ठेचून हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणात आणखी सखोल चाैकशी केली जात आहे. असे अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ही चारही मुले चिल्हाटी येथील रहिवासी असून, नुकतीच त्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे.

Crime News
Dhule Drought News : पाणीटंचाईग्रस्त गावांचे कोणी श्रेय घेईल का? टंचाईग्रस्त गावांचा दर वर्षीच पाण्यासाठी लढा

मृत मुलगी ही आपल्या पालकांसह गावीच अर्थात गोठणपार येथे शुक्रवार, १९ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता आयोजित लग्न सोहळ्यात उपस्थित होती. याचवेळी लग्न सोहळ्यात उपस्थित असलेल्या एका अल्पवयीन मुलाने तिला दुचाकीवर बसवून तीन ते साडेतीन किलोमीटर अंतरावरील वडेकसा जंगलात नेले. तिथे अर्थात जंगलालगतच्या रस्त्यावर या मुलाचे तीन मित्र उभे होते. त्यानंतर चाैघांनीही मिळून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलगी बेशुद्ध पडल्यानंतर तिची तिथेच दगडाने ठेचून हत्या केली.

Crime News
Nashik News : कोट्यधीश माजी आमदार गावितांच्या संपत्तीत अल्पशी वाढ; 5 वर्षांत अवघ्या 13 लाखांची भर

लग्न कार्यात व्यस्त असलेल्या पालकांना जेव्हा मुलगी लग्नस्थळी आढळली नाही, तेव्हा तिच्या पालकांनी सर्वत्र शोधाशोध केली. मात्र, कुठेही तिचा पत्ता लागला नाही. तथापि, शनिवार, २० एप्रिल रोजी धवलखेडी गावातील गावकरी जंगलात मोहफुल वेचण्यासाठी गेले असता तिथे त्यांना मुलीचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शींनी चिचगड पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घटनेचे गांभीर्य आेळखून पोलिसांनी तपासपथके गठित केली होती. परंतु, कुठलेही सबळ पुरावे नसल्याने आरोपींचा शोध घेताना अडचणी निर्माण झालेल्या होत्या.

अशा परिस्थितीत पोलिसांनी मोठ्या शिताफीने या घटनेचा तपास केला. मृत मुलीच्या मोबाईलवरून काही मुलांशी चॅटींग समजून आल्याने आणि हत्येचा वेळ सारखा असल्याने पोलिसांनी तपास चक्रे फिरवत चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत चौकशी केली. त्यातील दोन मुलांनी गुन्हा कबुल केल्याची माहिती अपर पोलिस अधीक्ष झा यांनी दिली. या चारही विधीसंघर्ष बालकांची नागपूर येथील बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. गुन्हा करणारी सर्व मुले १७ वर्षे दोन महिने, १७ वर्षे चार महिने, १७ वर्षे सहा महिने, १७ वर्षे दहा महिने या वयोगटातील आहेत. त्यांना १७ मे पर्यंत बालसुधारगृहात ठेवण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com