

Honour Killing Suspected in Betala Murder Case, Police Arrest Five
Sakal
भंडारा : मुलीने कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन दुसऱ्या जातीतील युवकासोबत लग्न केले. हा अपमान सहन न झाल्याने मुलीचा भाऊ आणि आईने तीन जणांच्या मदतीने जावयाचा गळा आवळून खून केला. तालुक्यातील बेटाळा येथे २६ जानेवारी रोजी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पाचही जणांविरोधात मोहाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मृताचे नाव आकाश शालिक शेंडे (वय ३०) रा. बेटाळा असे आहे.